प्रसव वेदना सोसून जेव्हा आई मी झाले

नऊ महिने मला आस तुझी लागलेली.
वेदनेच्या भरात रात रात जागलेली.
खरंच तुझ्या येण्याने धन्य मी झाले.
प्रसव वेदना सोसून जेव्हा आई मी झाले. ।।धृ.।।

डोहाळे माझे साऱ्यांनी डोळेभरून पाहिले.
गरोदरपणाचे रूप सर्वांनी न्याहाळीले.
प्रत्येकाच्या नयनीं आनंद तेव्हा बहरले.।।१।।
प्रसव वेदना सोसून जेव्हा आई मी झाले

रोज रोज तुझ्यासाठी संतुलित आहार मी घ्यायचे.
नवनवीन सल्ले वैद्यांचे पाळायचे.
प्रत्येकजण आतुर होते पाहण्या तुझे जन्म सोहळे.।।२।।
प्रसव वेदना सोसून जेव्हा आई मी झाले

कसा असेल बाळ माझा हे कुतूहल होते.
त्या रम्य कल्पनेत मन माझे डोलत होते.
गोंडस तुझे रूप साक्षात तेव्हा अवतरले.।।३।।
प्रसव वेदना सोसून जेव्हा आई मी झाले

तुला कुशीत घेता रोमहर्ष अनुभवले.
दुग्धधारेचा पान्हा तुझ्यासाठी पाझले.
तुझ्या मऊ मिठीत आनंदाश्रू तरळले.।।४।।
प्रसव वेदना सोसून जेव्हा आई मी झाले

कविता निर्मिती- महेंद्र पाटील