बाराखडीच्या एक एक अक्षरांनी,रचले जाते याचे घर,
गोल गोल दुनियेच्या जाळ्यात,याचीच तर आहे भर....

शब्दांच मांगल्य कस निस्वार्थी,प्रेमळ भावनेचं असावे,
मान,अपमान,अहंकार,त्याच्याही रूपात हे सामावते....

शब्दांचे मोल जरा जाणावे,बोलण्याआधी तोलून घ्यावे,
आनंद,दुःख,वात्सल्य,राग,द्वेष,मत्सर त्यातच तर आहे....

जीवनाच्या अनोळख्या आखणीला,शब्दच कारणीभूत,
परिस्थितीप्रमाणे बदलने,हीच शब्दांची गाथा अदभूत....

एखाद्याच केविलवाण मन,शब्द कधी जिंकून जातात,
तर अनपेक्षीतपणे कधी न संपणारा आघातच करतात....

आपुलकीचे चार शब्दाने,शरीराच्या जखमा भरतात,
पण शब्दाने होणारी मनाच्या,हृदयाच्या ठेचा तशाच राहतात....

शब्दांच्या या ज्वलंत विस्फोटात,सर्व क्षण मरण पावतात,
मग गर्दीच्या गोल जगात,त्या व्यक्ती एकट्याच रमतात....!